Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजकोलवडी येथे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

कोलवडी येथे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोलवडी (ता. हवेली) येथे सोमवारी (ता. 10) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सानिका संतोष गायकवाड (वय-17, रा. कोलवडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सानिका गायकवाड ही नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. दरम्यान, अकरावीला प्रवेश घेण्यापूर्वीच सानिका गायकवाड ही गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत सोमवारी (ता. 10) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आढळून आली. या घटनेची माहिती सानिकाच्या नातेवाईकांनी लोणीकंद पोलिसांना तत्काळ दिली. त्यानंतर लोणीकंद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सानिकाचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. सानिका गायकवाड हिने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments