Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजकोर्टात आरोपी नातवाची गॅरंटी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी संबंध, संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल;...

कोर्टात आरोपी नातवाची गॅरंटी देणाऱ्या आजोबांचे अंडरवर्ल्डशी संबंध, संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल; शिंदे गटाच्या नेत्याची धक्कादायक माहिती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला काही तासातच जामीन मंजूर झाला आहे. कोर्टात आरोपीच्या आजोबांनी नातवाबाबत हमी दिली की, तो आता वाईट संगत करणार नाही. तसेच कोर्टाने काही अटी घातल्यानंतर जामीन मंजूर झाला होता. मात्र, आता या आजोबांद्दल देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार आग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असं खळबळजनक आरोप केला आहे. तसेचं भोसले यांच्यावर कसा गोळीबार झाला होता, हे देखील सांगितले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले म्हणाले की, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यासाठी सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी बँकॉकला जाऊन छोटा राजनची भेट घेतली होती. हे सर्व पुरावे असूनही सुरेशकुमार अग्रवाल यांना अद्याप अटक झालेली नाही.

त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार जोरात असल्याने ते जातील तिकडे कायदा विकत घेतात. संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल आहे. कुटुंबातील सर्व लोकांवर दोन-दोन गुन्हे दाखल आहेत. आतादेखील अपघात प्रकरणानंतर आपण पैशांच्या जोरावर आपण सर्व काही विकत घेऊ, असं अग्रवाल कुटुंबाला वाटत आहे, असे भोसले म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले की, मी २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकीच्या निवडणुकीला उभा होतो. त्यावेळी माझे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे बंधू राम अग्रवाल यांच्याशी संबंध होते. तेव्हा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि राम अग्रवाल यांच्यात १२०० कोटींच्या संपत्तीवरुन वाद सुरु होता. तेव्हा मला धमकीसाठी सतत छोटा राजनचे फोन यायचे.

राम अग्रवाल हे सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देत नव्हते. यामध्ये मी राम अग्रवाल यांना पाठिंबा देतो, असे सुरेंद्रकुमार अग्रवाल याने छोटा राजनाला सांगितले. ते मला मारण्याची सुपारी देण्यासाठी बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटले होते, अशी माहिती भोसले यांनी यावेळी दिली.

छोटा राजनला अटक करुन भारतात आणल्यानंतर त्याच्याविरुद्धच्या सगळ्या केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. तेव्हा माझ्यावरील गोळीबारप्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक झाली पाहिजे होती. मात्र, अजूनही त्यांना पोलिसांनी अटक केलेली नाही. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पैसे देऊन हे प्रकरण रफादफा करायचे आहे, असा गंभीर आरोप अजय भोसले यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments