Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर

कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वारजे : वारजे येथील पुणे महानगरपालिकेच्या बारटक्के रुग्णालयातील कोरोना कीट घोटाळा प्रकरणात आरोग्य अधिकारी डॉ. अरुणा तारडे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी डॉ. अरुणा तारडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी फिर्यादी डॉ. सतीश कोळसुरे यांनी न्यायालयात धाव घेत, तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वारजे पोलिस ठाण्यात मागील महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वारजे भागात पुणे महानगरपालिकेचे कै. अरविंद बारटक्के रुग्णालय आहे. २०२१ मध्ये कोरोना काळात बारटक्के रुग्णालयात कोरोना चाचणी साहित्य, औषधे, जंतुनाशक तसेच अन्य वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आले होते. बारटक्के रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा सूर्यकांत तारडे व डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांनी नागरिकांच्या कोरोना चाचणीबाबत बनावट नोंदी केल्या, असा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून ८० ते ९० लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप होता.

या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी डॉ. अरुणा तारडे यांनी दिलेल्या अॅड. सतीश कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. डॉ. तारडे हे सरकारी नोकर (महिला वैद्यकीय अधिकारी) असताना, त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश हे सरकारची संमती असल्याशिवाय घेता येत नाही, असा युक्तिवाद बचावपक्षातर्फे अॅड. सतीश कांबळे यांनी केला. न्यायालयाने बचावपक्षाचा युक्तिवाद मान्य करत, डॉ. अरुणा तारडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी डॉ. अरुणा तारडे यांच्या डोक्यावरील अटकेची टांगती तलवार टळली आहे.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments