Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज कोरोनाचा धोका वाढला, संभाजीनगरात रुग्ण आढळले, मुंबईत मास्क वापरण्याचा सल्ला

कोरोनाचा धोका वाढला, संभाजीनगरात रुग्ण आढळले, मुंबईत मास्क वापरण्याचा सल्ला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई, दि. 22 डिसेंबर | देशभरात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट JN.1 मिळाल्यानंतर देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात केरळमध्ये ३०० रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. देशात कोरोना रुग्णाची संख्या 2,669 झाली आहे. कोरोनाचे रुग्ण छत्रपती संभाजीनगरात आढळले आहे. यामुळे कोरोनाचा धोका आता कोकणापासून मराठवाड्यापर्यंत पोहचला आहे. नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. दरम्यान, मुंबईत मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत मास्कची सक्ती नाही पण…

देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे आणि त्यातही जे-१ या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण कोकणात आढळल्याने पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. खबरदारी म्हणून मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी मास्कची सक्ती मात्र नाही, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.

संभाजीनगरात दोन रुग्ण आढळले

छत्रपती संभाजी नगर शहरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. ६६ नमुन्यांपैकी दोन रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. संभाजीनगर शहरात दोन कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेला प्रशासन चालना देणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश शिंदे यांनी बैठकीत दिले.

टास्क फोर्सची स्थापना करणार

राज्यात आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करावी. त्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स याबाबत माहिती घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments