Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर

कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त; ड्रोन, सीसीटीव्हींची राहणार नजर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कोरेगाव भीमा ऐतिहासिक विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासाठी सोमवारी (दि. १) होणारी गर्दी विचारात घेता परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणेपोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासाठी चार अपर पोलिसआयुक्त, ११ पोलिस उपायुक्त, ४२ सहायक आयुक्त , ८६ पोलिस निरीक्षकांसह तीन हजार दोनशे अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा तुकड्या, बॉम्बनाशक विरोधी पथक असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रभारी सहपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख आदी उपस्थित होते. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक तारखेला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावतात. त्यामुळे येथे लाखोंची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. यंदा विजयस्तंभ अभिवादनसाठी गतवर्षीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली असून वाहन पार्किंग, वाहतुकीतील बदल आदींचे नियोजन करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजार २०० अंमलदार, राज्य राखीव पोलिस दलासह बाहेरील जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी मागवण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments