इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरात उन्हाचा चटका तीव्र झाला असून, उपनगरासह जिल्ह्यातील काही भागांचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास गेला. आहे. सर्वाधिक तापमान कोरेगाव पार्क येथे ४१.१ अंश सेल्सिअस इतका झाला आहे. दरम्यान, उन्हाचा पारा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कमी दाबाचा पट्टा विरळ झाल्यामुळे शहरातील आकाश निरभ्र होत आहे. तसेच, हवामान कोरडे झाले असल्यामुळे उन्हाची किरणे थेट येत आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. गेले चार दिवस तापमान वेगाने वाढले आहे. अनेक भागांचे तापमान ४० अंशांच्या जवळपास आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून, अंगाची लाहीलाही होत अहे. त्यामुळे थंड पेय दुकानांकडे पावले वळाली आहेत. शहरातील दुपारचर्चा वर्दळ कमी झाली आहे. अनेक व्यवहार थंडावले आहेत. येत्या ८ ते ११ एप्रिलदरम्यान आकाश निरभ्र राहणार असून पारा ४२ अंशांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे दुपारी उन्हात फिरु नये तसेच बाहेर पडताना टोपी, छत्री, बुट परिधान करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शिरुर येथे कमाल तापमान ४०.९ अंश सेल्सिअस होते. तर राजगुरुनगर ४०.८, तळेगाव ढमढेरे ४०.७, पाषाण ४०.७, शिवाजीनगर ४०.२, हडपसर ४०.१, चिंचवड ३९.७, मगरपट्टां ३९.६, बारामती ३९.६, वडगावशेरी ३९.३, पुरंदर ३९.२, एनडीए ३९, इंदापूर ३८.८, आंबेगाव ३८.८, लवळे ३८.३, दापोडी ३८:२, माळीन ३८.२, दौंड ३८, भोर ३८, नारायणगाव ३७.९, निमगिरी ३६.८ तर हवेली येथे ३६.५ अंश सेल्सिअस तापमान होते.