Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज कोरियन तरुणीशी गैरवर्तन करणारा तरुण गजाआड, रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोरियन तरुणीशी गैरवर्तन करणारा तरुण गजाआड, रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : दिवाळीमध्ये भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका कोरियन व्लॉगर असणाऱ्या तरुणीसोबत पिंपरी चिंचवड शहरात एका फळ विक्रेत्या तरुणाने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी फळ बाजारात फिरत असताना या तरुणाने गैरवर्तन करत फोटो घेतला. याचा व्हिडिओ व्हायरल होताच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तरुणाला ताब्यात घेतले.

भरत करणराव हुनुसनाळे (२९, रा. रावेत मुळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणावर रावेत पोलिसांनी विनयभंग तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात एक कोरियन तरुणी भारतात फिरण्यासाठी आली होती. ती पिंपरी – चिंचवड शहरात रावेतमधील भोंडवे कॉर्नर येथे खरेदीसाठी गेली. त्यावेळी ती मोबाईलद्वारे चित्रिकरण करत होती. मात्र, त्याचवेळी येथील एका फळाच्या दुकानात काम करणारा भरत हुनुसनाळे याने कोरियन तरुणीसोबत फोटो काढला. त्यावेळी त्याने गैरवर्तन केले.

एवढ्या लांबून नसतो ओ फोटो, असा असतो फोटो, असे व्हिडिओमध्ये बोलत आहे. या प्रकारामुळे कोरियन तरुणी थोड्या त्रासिक स्वरात सर्वांना धन्यवाद देत निघून जाताना दिसत आहे. हा प्रकार तरुणीला अजिबात आवडला नसून ती घाबरल्याचेही तिच्या हावभावावरून लक्षात येते. दरम्यान, मंगळवारी (दि. १९) हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून गुंडा विरोधी पथकाने तरुणाला अटक केली.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments