Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजकोयत्याचा धाक दाखवून तरुणाची 50 हजारांची लूट; सिंहगड रस्त्यावरील प्रकार

कोयत्याचा धाक दाखवून तरुणाची 50 हजारांची लूट; सिंहगड रस्त्यावरील प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतच पोलिसही हैराण झाले आहेत. पोलीस प्रशासन देखील याबाबत कठोर कारवाई करत आहेत. अशातच आता सिंहगड रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडील 50 हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीचालक चोरटा आणि साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते वडगाव दरम्यान असलेल्या कॅनॉल रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुचाकीस्वार तरुण शुक्रवारी रात्रीघरी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीला अडवले. ‘गाडी हळू का चालवतोय’, अशी विचारणा करुन चोरट्यांनी त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. दुचाकीस्वारास गाडी रस्त्याच्या कडेला लावण्यास सांगितले. चोरट्यांनी त्याला शिवीगाळ केली. चोरट्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने तरुणाच्या गळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी तरुणाच्या खिशातील 50 हजारांची रोकड लुटून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.

याप्रकरणातील पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments