Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजकोयता बाळगणे भोवले; एकाला पोलिसांकडून अटक

कोयता बाळगणे भोवले; एकाला पोलिसांकडून अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी चिंचवड : येथे कोयता बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटककेली आहे. ही अटक तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे केली आहे. ही अटक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अभिषेक तिक्क्या रेड्डी (वय २५, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीसह अजून एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार मोहसीन अत्तार यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका या ठिकाणी अभिषेक पिस्तुलासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी अभिषेक तिक्क्या रेड्डीला ताब्यात घेतले आहे. त्याच्या अंगाची झडती घेतली असता आरोपीकडे एक पिस्तुल व सात जिवंत काडतुसे सापडली आहेत. यानंतर हे पिस्तुल देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments