Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजकोयता घेऊन दुकानदाराला २०० रुपयांची खंडणी मागणारा अल्पवयीन ताब्यात

कोयता घेऊन दुकानदाराला २०० रुपयांची खंडणी मागणारा अल्पवयीन ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : वडगाव शेरी परिसरात किराणा माल विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी सोमवारी (दि. ८) ताब्यात घेतले. त्याच्या अन्य साथीदारांबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात एका किराणमाल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्याचे साईनाथनगर भागात किराणामाल विक्रीचे दुकान आहे.

अल्पवयीन मुलगा दोन दिवसांपूर्वी दुपारी दोनच्या सुमारास दुकानात शिरला. या भागात व्यवसाय करायचा असेल तर खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली व कोयत्याचा धाक दाखवून दुकानदाराकडून २०० रुपये उकळले. अल्पवयीन मुलाने या परिसरातील अन्य दुकानदारांनाही खंडणीसाठी धमकावले. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर मुलाला ताब्यात घेण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments