Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकोंढवे- धावडे येथे धर्मवीर बलिदान मास सुरू

कोंढवे- धावडे येथे धर्मवीर बलिदान मास सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

खडकवासला : धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोंढवे – धावडे येथे अखंड ४० दिवस नित्य पूजन व स्मरण करण्यात येणार आहे. धर्मवीर बलिदान मास पाळला जाणार आहे. त्यांची आज गुरुवारी सुरुवात झाली. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्या बद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो. औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांना ४० दिवस वेदना देऊन हत्या केली. शंभुराजांना ४० दिवस वेदना दिल्या. याची या महिन्यात जाणीव रहावी. म्हणून आवडीच्या वस्तूं पदार्थांचा त्याग केला जातो.

माघ वद्य पंचमी, गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ ते फाल्गुन अमावस्या ८ एप्रिल २०२४ पर्यंत हा मास पाळला जाणार आहे. कोंढवे- धावडे येथील कोंढवेश्वर मंदिर येथे रोज सकाळी सात वाजता छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि स्मरण केले जाणार आहे.

औरंगजेबाने छत्रपती शंभूराजांची ४० दिवस वेदनाकारक रित्या हत्या केली होती. म्हणून या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळतात. या दरम्यान, ४० दिवस गोड खायचे नाही. पायात चप्पल घालायचे नाही. गादी एवजी जमिनीवर झोपायचे. अशा कृतीतून श्रदांजली व बलिदान मास पाळला जातो. बलिदान मास ही समाजमन घडवणारी, प्रभावी अशी श्रद्धांजली वाहण्याची पद्धत आहे. शिवप्रेमींनी सर्व बांधवांना हे समजावून सांगावे. यामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजक सुनीत लिंबोरे यांनी केले आहे.

धर्मवीर बलिदान मास उभ्या हिन्दु समाजाला अंतरमुख करणारा, क्लेशकारक, दुःखदायक मास आहे. हा मास सर्वांनी सामाजिक पातळीवर, कुटुंब पातळीवर व व्यक्तिगत पातळीवर पाळला पाहिजे. हीच खरी श्रदांजली धर्मवीर संभाजी महाराजांना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments