Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजकॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न

कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात संपन्न

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता) 

पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात २१ जून रोजी हेल्थकेअर कमिटी अंतर्गत “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “यु व्ही मॉडर्न आयुर्वेद आणि योगा” मार्फत शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. उर्वशी अग्रवाल, ज्ञानेश्वरी जगताप यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्व सांगितले, तसेच प्राणायाम घेण्यात आले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अश्विनी शेवाळे यांनी आजचा दिवस “करा योग रहा निकोप” या संकल्पनेचे महत्त्व सांगितले. तसेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर योगाचा सखोल प्रभाव अधोरेखित करणे हा या मागचा उद्देश असल्याची माहिती देण्यात आली. आरोग्य आणि कल्याण वाढवण्यासाठी योग हे एक शक्तिशाली साधन आहे असे सांगण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन माननीय प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शितल बोरस्ते यांनी केले. तर आभार प्रा. सोनाली वाघ यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments