Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज कैद्याची टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्याः येरवडा कारागृहातील घटना; मोबाईल चोरीच्या संशयावरून...

कैद्याची टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्याः येरवडा कारागृहातील घटना; मोबाईल चोरीच्या संशयावरून बुधवार पेठेत महिलेचा खून

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या एका कैद्याने कारागृहातील रुग्णालयात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मंगेश भोर (वय-30, रा. जुन्नर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहाने दिलेल्या माहितीनुसार, कैदी मंगेश भोर हा मागील दहा महिन्यापासून येरवडा कारागृहात बंदिस्त आहे. आईला मारहाण केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल असून याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली होती. त्याच्यावर दाखल असलेला गुन्हा आई मागे घेत नसल्याने तसेच त्याला जामीन मिळावा याकरिता ती प्रयत्न करत नसल्याने तो तणावात होता. त्यामुळे त्याने यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु कारागृह कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने जीव वाचला होता परंतु त्याने कारागृह कर्मचारी यांचे नजरेपासून दूर जात कारागृहातील रुग्णालयात टॉवेलने फाशी घेऊन अात्महत्या केली अाहे. रुग्णालयात त्याच्यावर मानसिक उपचार मागील काही काळापासून सुरु होते.

बुधवार पेठेत महिलेचा खून

मोबाईल चोरी केल्याचे संशयातून बुधवार पेठेत एका महिलेस दोनजणांनी बेदम मारहाण केल्याने, यामध्ये महिलेचा मृत्यु झाल्याचा प्रकार घडला अाहे. वर्षा थोरात (वय – ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव अाहे. याप्रकरणी फरासखाना पोलीसंनी गौरव चौगुले अणि अब्दुल सय्यद या दोन अारोपींना अटक केली अाहे. सदरचा प्रकार बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजवळ सोमवारी घडला अाहे. मयत वर्षा थोरात ही फिरस्ता असून तिला दारुचे व्यसन होते. तर अब्दुल सय्यद याची हातगाडी असून त्याचा दहा ते बारा दिवसापूर्वी मोबाईल चोरीस गेला होता. संबंधित मोबाईल हा वर्षा थोरात हिने चोरल्याचा संशय त्याला होता त्युळे याबाबत गौरव व त्याने तिच्याशी वाद घातला. त्यानंतर तिच्य डोक्यात काठीने बेदम मारहाण केल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. याबाबत पुढील तपास फरासखाना पोलीस करत अाहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments