Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजकेसनंद फाटा येथे अज्ञात वाहनाची विद्युत खांबाला धडक; रात्रभर अख्खं गाव अंधारात

केसनंद फाटा येथे अज्ञात वाहनाची विद्युत खांबाला धडक; रात्रभर अख्खं गाव अंधारात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली, (पुणे) : वाघोली-केसनंद फाटा येथे रस्त्यावर असलेल्या विद्युत लोखंडी खांबाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत एक लोखंडी विद्युत खांब वाकून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरातील विद्युत प्रवाह रात्रभर खंडीत झाला होता. ही घटना गुरुवारी 30 मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघोली पोलीस ठाण्याच्या मागील रोड लगत असलेल्या विज वितरण कंपनीच्या विद्युत खांबाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत लोखंडी खांब वाकून तारा तुटून रस्त्यावर पडल्या, तर काही ठीकाणी लोंबकळत होत्या. यामुळे रात्रभर विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

ही घटना घडली त्यावेळी डीपी वरुन ११ केव्हीचा विद्युत पुरवठा सुरु होता. तर अन्य पोलवर एलटी लाईन २३० होल्टचा लोड होता. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली असून लोक वर्दळीच्या भागात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यापुर्वी देखील या परिसरात वाहनांनी रात्रीच्या वेळी धडक दिल्याने विद्युत खांबाचे नुकसान झाले होते. यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान, विज वितरण कंपनीकडुन अद्याप अज्ञात वाहनचालाकाविरुध्द उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments