Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजकेअर टेकर तरुणीवर बिअर पाजून बलात्कारः पुण्यातील संतापजनक घटना, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या...

केअर टेकर तरुणीवर बिअर पाजून बलात्कारः पुण्यातील संतापजनक घटना, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

आई-वडील व आजीच्या निधनानंतर आपल्या मामाकडे राहणाऱ्या एका केअरटेकर तरुणीवर बिअर पाजून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील एका 24 वर्षीय तरुणीचे आई-वडिलांचे अपघातात निधन झाले होते. त्यानंतर तिचा सांभाळ आजी करत होती. परंतु कोरोनात आजीचे देखील निधन झाल्याने तिचा सांभाळ चुलत मामा करु लागला.

यादरम्यान, पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात एका कुटुंबातील महिलांचा सांभाळ करण्यासाठी तिने केअर टेकरची नोकरी एजन्सीच्या माध्यमातून स्विकारली. मात्र, सदर कुटुंबातील व्यक्तीने तिला जबरदस्तीने एका लॉजवर नेऊन मारहाण करत बिअर पाजली आणि तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

कुठे व केव्हा घडली घटना

याबाबत पिडित तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी प्रवीण बंब (वय-45, रा.मार्केटयार्ड, पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे. सदरचा प्रकार एप्रिल 2024 ते 11 मे 2024 दरम्यान सिंहगड रोड खडकवासला धरणाच्या पुढील एका लॉजमध्ये व आरोपीच्या राहत्या घरी घडला.

आई व पत्नी होती आजारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण बंब हा शेअर मार्केट व बांधकाम कॉन्ट्रक्टरची कामे करतो. त्याची आई आजारी असल्याने घरी बेडवर झोपून असते, तर पत्नी देखील आजारपणाने ग्रस्त आहे. त्यामुळे आईचा सांभाळ करण्यासाठी त्याने एका केअर टेकर एजन्सीशी संपर्क साधून पिडित तरुणीला कामासाठी 4 महिन्यापूर्वी ठेवले होते. मात्र, आरोपीने घरी पत्नी नसताना, तिला हाताला धरुन ओढून जबरदस्तीने त्याच्या बेडरुममध्ये नेऊन तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगू नको नाहीतर तुझा गळा दाबून तुला मारुन टाकीन अशी धमकी देखील दिली.

मी तुमच्या मुलींसारखी, मला सोडा

त्यानंतर पुन्हा आरोपी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला चल आपण मस्त मज्जा करु, असे म्हणाला. त्यावर तरुणीने तुम्ही माझ्या वडिलांसारखे असून, तुम्हाला माझ्यासारख्या मुलीही आहेत, तरीही तुम्हाला असे बोलण्यास लाज वाटत नाही का? असे प्रत्युत्तर दिले. यामुळे आरोपीने तरुणीला कारमध्ये बस नाहीतर मी तुला ठार मारेन अशी धमकी दिली. त्यानंतर तिला घेऊन तो सिंहगड रोडने खडकवासला धरणाच्या पुढे एका लॉजवर घेऊन गेला. तिथे तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिला बिअरही पाजली. तसेच कुणाला काही सांगितले तर जीवे मारेन अशी धमकीही दिली. याबाबत पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments