इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा पेन्शनधारक असालतर तुमचा पगार आणि पेन्शन लवकरच वाढू शकते. कारण, सरकार लवकरच महागाई भत्ता अर्थात DA आणि महागाई मदत अर्थात DR मध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. ही वाढ एक जानेवारी 2025 पासून लागू केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
यावर्षी केंद्र सरकारकडून डीए 2% ते 4% वाढू शकतो. जर फक्त 2% वाढ झाली तर ती गेल्या 7 वर्षांतील सर्वात कमी वाढीपैकी एक असेल. केंद्र सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये DA चा आढावा घेते. AICPI-IW च्या डेटाच्या आधारे, DA निर्धारित केला जातो. सध्या डीए 53 टक्के आहे आणि त्यात दोन टक्के वाढ झाली तर 55 टक्के होईल. त्यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 20000 असल्यास, DA मध्ये 2 टक्क्यांनी वाढ केल्यास त्याचा पगार 400 ने वाढू शकेल.
त्याचप्रमाणे, 3 टक्के किंवा 4 टक्क्यांची वाढ झाल्यास, ही रक्कम 600 आणि 800 ने वाढेल. ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारने डीए 50 टक्क्यांवरून 53 टक्के केला होता. आता पुन्हा एकदा यामध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.