Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजकेंद्र सरकारच्या माध्यमातून इंदापूरात विकासाच्या योजना राबविणार : हर्षवर्धन पाटील

केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदापूरात विकासाच्या योजना राबविणार : हर्षवर्धन पाटील

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इंदापूर : केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली स्थिर वमजबूत सरकार स्थापन झाले आहे. नूतन केंद्र सरकारच्या माध्यमातून व त्यांच्या आर्थिक सहाय्यातून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी शेतीचा पाण्याचा प्रश्न, उद्योगधंदे, अँग्रो प्रोसेसिंग आदी विकासाच्या योजना आगामी काळामध्ये राबविण्यात येणार आहेत. केंद्रातील सत्तेचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला जाईल, अशी माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. इंदापूर येथे पत्रकारांची संवाद साधताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या शपथविधी सोहळ्यास मी उपस्थित होतो. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारताच शंभर दिवसांचा विकासाचा रोड मॅप तयार केला आहे. देशातील सर्वसामान जनतेचे, सर्व समाजाचे हे सरकार राहणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना तालुक्यात राबविण्याचे नियोजन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आदींसह राज्यातील सहा नूतन मंत्र्यांचे आपल्याला सहकार्य मिळणार आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी आंम्ही प्रयत्नांची पराकाष्टा केली. प्रचार यंत्रणा कमी पडू दिली नाही. तरीही निवडणुकीत यश मिळू शकले नाही. चुका काय झाल्या, मतदान का मिळाले नाही? या संदर्भात ज्या त्या पक्षाच्या स्तरावर उहापोह केला जाईल, असंही पाटील म्हणाले.

तालुक्यात पाऊस झाला असला तरीही लगेच टँकर बंद करू नका, असे आंम्ही प्रशासनास सांगितले आहे. तसेच तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे, त्या संदर्भात कृषी आयुक्तांशी बोलणे झाले आहे. विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांच्यात समन्वय हवा, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. यावेळी तालुका अध्यक्ष अँड. शरद जामदार, मारुती वनवे, अँड. मनोहर चौधरी, बाबा महाराज खारतोडे, अॅड. अशोक कोठारी, रघुनाथ राऊत, अशोक इजगुडे, राजकुमार जाधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments