Monday, July 7, 2025
Homeक्राईम न्यूज'कॅम्प कोला' डीलरशिपचे दाखवले आमिष; बारामतीतील व्यावसायिकाला घातला चार लाखांचा गंडा

‘कॅम्प कोला’ डीलरशिपचे दाखवले आमिष; बारामतीतील व्यावसायिकाला घातला चार लाखांचा गंडा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामतीः रिलायन्सच्या ‘कॅम्प कोला’ कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून दौंड तालुक्यातील सुपे येथील एका व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी ‘कॅम्प कोला’ कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी बिल ५ लाख १० हजार रुपये झाल्याचे सांगत, त्यापैकी अर्धी रक्कम भरण्यास सांगितले, संपूर्ण संभाषण फोनवर झाले, तक्रारदाराने अॅग्रीमेंटसाठी तयारी दर्शवली आणि सुरुवातीला ४९,५०० रुपये गुगल पे द्वारे पाठवले. कंपनीसोबत करार (अॅग्रीमेंट) केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला भेट देईल, असे तक्रारदाराला सांगण्यात आले. वैभव चांदगुडे असे तक्रारदाराचे नाव आहे.

तक्रारदाराने बँकेकडून कर्ज काढून जवळपास ९० हजार १९० रुपये पाठवले. त्यानंतर आणखी २ लाख ५० हजार रुपये आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. अशाप्रकारे, एकूण ३ लाख ८९ हजार ६९० रुपये त्यांनी पाठवले, ठरल्या प्रमाणे अर्धी रक्कम पाठवल्यावरही कोणीही भेटायला आले नाही. दरम्यान, तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे समजले.

वैभव चांदगुडे यांना संशय आला. त्यांनी स्वतः चौकशी केली असता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ‘कॅम्प कोला’ कंपनीचा अधिकृत संपर्क होत नसल्याने सुमारे चार लाख रुपयांना गंडा घातल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी तातडीने सायबर पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments