इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासूनच या मतदारसंघात जोरदार टक्कर होत असून, मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर सुनील कांबळे ४२९ मतांनी आघाडीवर आहेत.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१४ पासून येथे भाजपचे कमळ फुलले आहे. रमेश बागवे हे काँग्रेसचे अनुभवी नेते असून त्यांनीही या मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व के आहे. तर भाजपचे सुनील कांबळे हे येथील विद्यमान आमदार असून दोघांमध्ये सध्या कडवी झुंज सुरु आहे.
सातव्या फेरी अखेर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांना 24 हजार 448 मते तर काँग्रेसच्या रमेश बागवे यांना 22 हजार 492 मते कांबळे 1156 मतांनी आघाडीवर आहे.