इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा झाल्यानंतर २४ तासांत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी काँग्रेस आमदार सहकारी बँक प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांचीही आमदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती. आता मात्र कोकाटे हे महायुती सरकारमध्ये मंत्री असल्याने आणि सत्तेत महायुतीत असल्याने आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधिमंडळ सचिवालय काय भूमिका घेते, याची उत्सुकता आहे.
वरिष्ठ न्यायालयाने दोषसिद्धीस स्थगिती दिली, तरच संबंधित व्यक्तीची आमदार-खासदारकी वाचू शकते. कोकाटे यांनी वरच्या न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे जेव्हा सुनावणी होईल तेव्हा होईलच, पण त्याआधी विधानसभा अध्यक्ष आणि विधिमंडळ सचिवालयाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने २४ तासांत अपात्र ठरवले होते.
तसेच गेल्या वर्षी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यात ५ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर विधानसभा सचिवालयाने त्यांना काही तासांतच अपात्र ठरवले. कोकाटे यांना अपात्र ठरवताना विधानसभा अध्यक्षांची मोठी कसोटी लागणार आहे. आता कोकाटे अपात्र ठरवले जाणार की राजकीय हस्तक्षेप करून आमदारकीसोबत मंत्रीपद वाचणार याची उत्सुकता आहे