Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकुरकुंभ एमआयडीसीत ड्रग्ज बनवण्याचे 340 किलो सुडो एफेड्राइन पावडर जप्तः पावडर तपासणीसाठी...

कुरकुंभ एमआयडीसीत ड्रग्ज बनवण्याचे 340 किलो सुडो एफेड्राइन पावडर जप्तः पावडर तपासणीसाठी पाठवणार फॉरेन्सिक लॅबमध्ये

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकानेपश्चिम बंगालमधील मालदा येथून ताब्यात घेतलेल्यासुनील बर्मनच्या चौकशीत तब्बल ९ पोत्यात ३४० किलोड्रग्ज पावडर सापडली असून सुडो एफेड्राइन असे यापावडरचे नाव आहे. या पावडरची पोती भरलेला एकटेम्पो विश्रांतवाडीतील वैभव कॉलनी येथील परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही पावडरतपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. दरम्यान, ही पावडर कुरकुंभ येथे मेफेड्रोनबनवण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याचे प्राथमिकतपासात उघड झाले आहे.

अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्या संपर्कात असलेल्या पश्चिम बंगालमधील सुनील बर्मनला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. फरार आरोपींपैकी तोएक संशयित होता. त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीतत्याने हैदर नूर शेखसाठी काम करत असल्याचे सांगितले. विश्रांतवाडी येथे सापडलेल्या तीन गोडाऊनपैकी एकगोडाऊन बर्मनच्या नावाने आहे, तर ताब्यात घेतलेला टेम्पोहीबर्मनच्या गोडाऊनमधील माल वाहतूक करण्यासाठीवापरण्यात येत होता. याचा वापर हैदरच करत होता. मात्र, अटक केल्यानंतर हैदरने टेम्पो संदर्भातील माहिती पोलिसांनादिली नाही. अटकसत्र सुरू झाल्यावर हा टेम्पो तसाचरस्त्याच्या कडेला उभा होतो. हा टेम्पो बर्मनच्यागोडाऊनपासून तीन किलोमीटर अंतरावर लावला गेला होता. बर्मनने माहिती देताच पोलिसांनी टेम्पो जप्त केला.

हैदर म्हणतो मी छोटा प्यादा

पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली येथेछापे टाकून मेफेड्रोन तस्करी उघडकीस आणून ३ हजार ७०० कोटी मेफेड्रोन जप्तकेले. याप्रकरणी वैभव ऊर्फ पिंट्या भारतमाने (रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (रा. भैरवननगर, विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (रा. पिंपळे सौदागर, पिंपरी-चिंचवड), युवराजबभ्रुवान भुजबळ (रा. गरिबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम), दिवेश भुतिया, संदीपकुमार (दोघे रा. दिल्ली), आयुबअकबर मकानदार (रा. सांगली) यांना अटककरण्यात आली. पुणे शहरातील मालाचीसाठवणूक आणि वितरणाची सर्व जबाबदारीहैदरवर असल्याचे उघड झाले. अठअारोपींना प्रथमवर्ग न्यायाधीश अमृतबिराजदार यांच्या न्यायालयात शनिवारी तपास अधिकारी शब्बीर सय्यद यांच्या पथकाकडूनहजर करण्यात अाले. या वेळी तीन अारोपींनाचार मार्चपर्यंत, तर पाच अारोपींना सहामार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात अाली.

सुडो एफेड्राइन नावाची ही पावडर :

अमितेशकुमार पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात सुडो एफेड्राइन नावाची ही पावडरअसल्याचे समजते. ही पावडर कफ सिरपमध्ये वापरता येते. तसेच त्याच्यापासून क्रिस्टल मेथ नावाचे उच्चड्रग्जही बनवले जाते. ही पावडर नऊ गोण्यांमध्ये भरलेली होती. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर हे ड्रग्ज आहेका? याबद्दल आम्हाला सांगता येईल. मात्र, हा माल कुरकुंभ येथे संबंधित कंपनीत पाठवण्यात येणार होता. हैदरने हा माल कोठून अाणला याबाबत तपास करण्यात येत अाहे.

पुण्यातील मालाची साठवणूक, वितरणाची जबाबदारी होती हैदरवर

साठा एका जागी न करण्याचीखबरदारी : बलकवडे अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनीसांगितले की, आरोपी सर्व ड्रग्ज एकाचठिकाणी न ठेवण्याची काळजी घेत होते. तेकाही माल गोडाऊन, तर काही माल गाडीतठेवत होते. सांगली येथील गोडाऊनमधून मालदिल्ली, गोवा आणि बंगळुरू येथे जात होता. त्यादृष्टीनेही तपास केला जात आहे. तसेच रेल्वेने हेड्रग्ज दिल्लीला पाठवण्याचादेखील पोलिसांनासंशय असून त्याबाबत चौकशी करण्यात येत अाहे. त्यांनी आणखी कोठे माल ठेवला आहे कायाची झाडाझडती घेतली जात आहे. पुण्यातीलसराईत १५ ते २० ड्रग्ज पेडलर अारोपी हे संबंधितगन्हाातील अारोपींच्या संपर्कात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments