Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज कुटुंबासाठी अभिनेत्याने केलं सर्वकाही, कोट्यवधींचं घर बांधलं, पत्नीसमोर स्वतःचं दुःख लपवलं पण.....

कुटुंबासाठी अभिनेत्याने केलं सर्वकाही, कोट्यवधींचं घर बांधलं, पत्नीसमोर स्वतःचं दुःख लपवलं पण…..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी अनेकदा खस्ता खाल्ला.

कुटुंबाच्या आनंदासाठी अनेक मर्यादा ओलांडल्या आणि स्वतःचं दुःख मात्र मनाच्या एका कोपऱ्या दडवून ठेवलं. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते किरण कुमार. गेल्या अनेक वर्षांपासून किरण कुमार चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका देखील बजावली. ६९ वर्षीय किरण कुमार यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात आलेल्या चढ – उतारांबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र किरण कुमार यांची चर्चा रंगली आहे.

किरण कुमार यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आली, जेव्हा त्यांना बी आणी सी ग्रेड सिनेमांमध्ये काम करावं लागलं. किरण कुमार यांना स्वतःच्या स्वप्नातील घर साकारण्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. पण आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांमुळे किरण कुमार कधीच खचले नाहीत.

मोठ्या धौर्याने किरण कुमार यांनी परिस्थिती हाताळली. कुटुंबाबद्दल देखील किरण कुमार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र किरण कुमार यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. किरण कुमार म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांना आनंदाची बातमी देता, तेव्हा कुटुंब देखील तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतं..

पुढे अभिनेते म्हणाले, ‘पण जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त पैशांसाठी काम करता, मी देखील काही सिनेमे पैशांसाठी केले आहे. तेव्हा तुम्ही एका वेगळ्या परिस्थितीत असता. समोर आलेली परिस्थितीत नकारात्मक नसते. फक्त ती परिस्थिती तुम्हाला स्वीकारता येत नाही. जर तुम्ही तुमच्या पत्नीला सांगितलं तर, ती दुःखी होणार…’

‘मी कायम माझ्या पत्नीपासून माझ्या भावना लपवून ठेवल्या. जेव्हा मी घरी यायचो तेव्हा मला प्रचंड वाईट वाटायचं, पण मी पत्नीसमोर कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचो. फक्त घराबाहेर असलेल्या पिलर्सकडे पाहायचो. एक पिलर ४ लाख रुपयांचा होता, असे एकून ११ पिलर्स होते आणि त्यांची किंमत होती ४४ लाख रुपये…

माझं घर उभं राहिलं तेव्हा माझ्या करियर धोक्यात होतं. घर तयार होण्यासाठी ६ वर्ष लागली. पैसै एकत्र करत होतो. त्यासाठी बी आणि सी ग्रेड सिनेमांमध्ये काम करत होतो. मी कधीच सिनेमांवर टीका करणार नाही. कारण त्यामुळे माझं घर तयार झालं आहे.’ असं देखील किरण कुमार म्हणाले.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments