Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकी प्रकरणः आरोपी ससून रुग्णालयातून पळाला,...

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकी प्रकरणः आरोपी ससून रुग्णालयातून पळाला, पोलिस दलात खळबळ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लीलाकरला पुणे पोलिसांनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ याला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती.

येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने त्याला ससून हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा पोलिस त्याचा शोध घेत आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींना 7 दिवसांची मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्या मोबाईलमधून महत्त्वपूर्ण 6 ऑडियो क्लिप पोलिसांना मिळाल्यात. त्यामार्फत आणखी माहिती हाती लागू शकते असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे आरोपींना 7 दिवसांची मोक्का कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, मुन्ना पोळेकरसह इतर आरोपींना 7 दिवसांची मोक्का कोठडी मिळाली आहे.

नेमके प्रकरण काय?

पुण्यात 5 जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहळची हत्या झाली. हत्येनंतर या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 16 जाणांना अटक केली आहे. मुन्ना पोळेकर हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. 5 फेब्रुवारी रोजी शरद मोहळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरून मुन्ना पोळेकरच्या नावाच्या अकाऊंटवरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे.

मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, तर याच्याच नावाने शरद मोहोळच्या पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळची त्याच्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर शरद मोहोळची पत्नी माध्यमांसमोर आली होती.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments