Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: 17 आरोपी विरुद्ध पोलिसांची मोक्का कारवाई;...

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: 17 आरोपी विरुद्ध पोलिसांची मोक्का कारवाई; गुन्हे शाखेने संबंधित टोळीच्या मुसक्या आवळल्या

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कुख्यात गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणात मुख्य सूत्रधार टोळी प्रमुख विठठल महादेव शेलार याच्यासह १७ साथीदारांविरुद्ध पोलिसांकडून मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेने संबधित टोळी वरील मोक्का कारवाईच्या प्रस्तावावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

गुन्हे शाखेने संबंधित टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर आणखी एक मुख्य आरोपी गणेश मारणे याचा पोलिसांच्या दहा पथकाकडून शोध घेतला जात आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही 114 वी कारवाई आहे.

यांच्यावर झाली मोक्काची कारवाई

साहील ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय 20), नामदेव महिपती कानगुडे (वय 34), विठ्ठल किसन गांडले (वय 20 सर्व रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय 24 रा. पर्वती,) चंद्रकांत शाहु शेळके (वय २२ पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय 20 रा. पौड रोड, मुळशी) रविंद्र वसंतराव पवार (वय ४० रा. नांदे गाव, ता. मुळशी) संजय रामभाऊ उढाण (वय ४३ रा. उजवी भुसारी, कोथरूड), सतीश संजय शेडगे (वय २८, रा. माथवाडी फाटा, भुगाव), धनु उर्फ धनंजय मारूती वाटकर (वय 25, रा. सैदापुर कराड, ता. कराड), नितीन अनंता खैरे (वय ३४, रा. गादिया इस्टेट, कोथरूड) आदित्य विजय गोळे (वय २४ रा. पिरंगुट, ता. मुळशी) संतोष दामोदर कुरपे (वय ४९ रा. कोथरूड), रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६ रा. उरवडे, ता. मुळशी) विठठल महादेव शेलार (वय ३६ रा. मु. बोथरवाडी, पो. उरवडे, ता. मुळशी) (टोळी प्रमुख), प्रितसिंग (रा. उमरठी, मध्य प्रदेश), गणेश मारणे (रा. कर्वेनगर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

या पोलिसांनी केली कारवाई

आरोपी विठठल महादेव शेलार (टोळी प्रमुख) याने संघटीतपणे टोळया चालवुन बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ घेतला आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे दाखल आहेत. संबंधित टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव एसीपी सुनील तांबे यांनी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यावतीने अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांना सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय विवेक पाडवी, पोलीस अंमलदार, सुनिल राऊत, शरद वाकसे, नितीन कांबळे, नितिन काळे, गणेश ढगे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments