Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज कुख्यात गुंड मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीः खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेल्या गुंडाने खासदार श्रीकांत...

कुख्यात गुंड मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीः खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेल्या गुंडाने खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन केला सत्कार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील कुख्यात गुंड किशोर मारणे खून प्रकरणी गुंड शरद मोहळ सोबत गुन्हेगार हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केल्याने एकच खळबळ माजली आहे.

हेमंत दाभेकर हा दिवंगत गुंड शरद मोहळ याच्यासह गंभीर गुन्ह्यात साथीदार आहे. सध्या हेमंत दाभेकर हा कारागृहातून जामीनावर बाहेर असून, शरद मोहोळ याचा जवळचा साथीदार मानला जातो. त्यामुळे त्याने मुख्यमंत्री निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहे.

गुन्हेगार गणेश मारणे टोळीने पुण्यातील कोथरूड परिसरात पाच जानेवारी रोजी नामचीन गुंड शरद मोहोळ याचा गोळी झाडून निघृण खून केला होता. त्यानंतर पुण्यात पुन्हा गुन्हेगार टोळ्यांनी हिंसा सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने गुन्हेगार आणि राजकीय नेते यांच्यातील साटेलोटे पुन्हा एकदा समोर आले.

कुख्यात गुंड शरद मोहळ हा भारतीय जनता पक्षाचे सक्रिय काम करत होता. तर गुंड गजानन मारणे यांच्या पत्नीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आणि आता गुंड हेमंत दाभेकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. तर सिमीचा संशयित असल्याचे गुन्हे दाखल असलेला पिंपरी चिंचवडचा आसिफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments