Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजकुंभमेळ्यासाठी १५ जानेवारीला पुण्यातून धावणार विशेष रेल्वे

कुंभमेळ्यासाठी १५ जानेवारीला पुण्यातून धावणार विशेष रेल्वे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : रेल्वे विभागाच्या आयआरसीटीसीच्यावतीने भारत गौरवचीविशेष रेल्वे पुण्यातून कुंभमेळ्यासाठी सोडण्यात येणार आहे. पुढील महिन्यात १५ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुण्यातून कुंभमेळ्यासाठी धावणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे टुरिझम व्यवस्थापक सुभाष नायर यांनी दिली. केंद्र शासनाच्या देखो अपना देश या योजनेअंतर्गत भारत गौरव ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात जाली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आत्तापर्यंत ८६ रेल्वे गाड्या धावल्या आहेत. यातीलच आणखी एक विशेष रेल्वे गाडी येत्या १५ तारखेला पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेश येथील कुंभमेळ्यासाठी धावणार आहे.

पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे अशी असणार आहे. आठ दिवस आणि सात रात्रींचा हा प्रवास असणार आहे. या गाडी; ला ७ स्लीपर, ३ थर्ड एसी, १ सेकंड एसी आणि एक पेन्ट्री कार अशी डब्यांची रचना असणार आहे. नायर, म्हणाले की, पुण्यातून कुंभमेळ्यासाठी आम्ही विशेष गाडीचे नियोजन केले आहे. या गाडीमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटिव्ही, जेवणाची व्यवस्था असणार आहे. तसेच कुंभमेळ्याच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंटसिटीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. येथेही प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध केल्याची माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments