इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : केंद्र सरकारची किसान क्रेडिट कार्ड योजना फायद्याचीठरत आहे. देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 10 लाख कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे. या कार्डद्वारे देशातील 7.72 कोटी शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, ऑपरेटिव्ह किसान क्रेडिट कार्ड (KCC) खात्यांतील रक्कम मार्च 2014 मधील 4.26 लाख कोटी रुपयांवरून डिसेंबर 2024 मध्ये 10.05 लाख कोटी रुपयांपर्यंत दुप्पट झाली आहे. KCC हे एक बँकिंग उत्पादन आहे जे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या कृषीसंबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी फायद्याचे असे ठरत आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन यांसारख्या संलग्न व्यवसायासाठी चालू भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी KCC योजनेचा 2019 मध्ये विस्तार करण्यात आला.
सुधारित व्याज अनुदान योजनाअंतर्गत, वार्षिक 7 टक्के सवलतीच्या दराने KCC द्वारे 3 लाख रुपयांपर्यंत अल्प मुदतीचे कृषी क्रेडिट दिले जाते. बँकांना 1.5 टक्के व्याज सवलतही दिली जाते. दरम्यान, कर्जाची वेळेवर परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त त्वरित परतफेड प्रोत्साहन दिले जाते, जे प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी व्याज दर 4 टक्क्यांपर्यंत कमी करते. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची अशी ठरत आहे.