Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजकिळसवाणी घटना ! अल्पवयीन मुलीला फूस लावत ओढले प्रेमाच्या जाळ्यात, पाजली दारु...

किळसवाणी घटना ! अल्पवयीन मुलीला फूस लावत ओढले प्रेमाच्या जाळ्यात, पाजली दारु अन् …

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यात बदलापूर येथे एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मंगळवारी मोठा जनक्षोभ पाहायला मिळाला. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत तोडफोड केली. ही घटना ताजी असतानाच पुण्यात एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला दारू पाजत बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि अल्पवयीन आरोपीची ओळख होऊन त्यांच्यात मैत्री ही झाली होती. आरोपीने, या मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिला गोड बोलून तिच्यावर बलात्कार केला.

काही दिवसानंतर मुलीच्या मैत्रिणीने मुलीला फूस लावून एका मित्राच्या घरी घेऊन गेले. मित्राच्या घरी घेऊन गेल्यानंतर मुलीला दारु पाजवली. त्यादरम्यान, दारुच्या नशेत मुलीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. मित्राबरोबर असलेल्या दुसऱ्या मुलाने मोबाईलवर त्या मुलीचे नग्न आणि शरीर संबंधाची छायाचित्रे काढली गेली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड करत आहेत.

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, आत्महत्या यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments