Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकाश्मिरी तरुणाकडून लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारः 23 वर्षीय तरुणीकडून कोरेगाव पोलिस ठाण्यात...

काश्मिरी तरुणाकडून लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारः 23 वर्षीय तरुणीकडून कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ऑफिस मधील ओळख आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनियरने महिला सहकाऱ्यावर विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाऊद युसुफ दर (वय-27, कोरेगाव पार्क, मूळ बारामुल्ला, काश्मीर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना सप्टेंबर 2023 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी दाऊद दर हे एकाच कंपनीत कामाला आहेत. आरोपीने फिर्यादी यांच्याशी जवळीक साधून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच हॉटेल मधील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस निमकर करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments