Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजकाल फोन, आज थेट पुणे पोलीस आयुक्तालयात; देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये

काल फोन, आज थेट पुणे पोलीस आयुक्तालयात; देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल कार अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. श्रीमंत बापाच्या बेजबाबदार मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोन व्यक्तींचा जीव घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा कारचालक मुलगा अल्पवयीन असल्याने न्यालायानेही त्याला १५ तासांच्या आत जामीन मंजूर केला. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर आता राज्य सरकारनेही या अपघातप्रकरणी अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल पुणे पोलीस आयुक्तांना फोन आणि आज थेट पुण्यात पोहचले आहेत. पुण्यातल्या आयुक्तालयात त्यांनी बैठक घेतली आणि आत्तापर्यंत जे घडलं त्याचा आढावा घेतला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी पुढील कारवाईचे निर्देश देखील दिले आहेत. पुण्यातल्या पोर्श कारच्या या अपघात प्रकरणी गृहमंत्री स्वतः मैदानात उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पोहचून पोलिसांची तातडीची बैठक घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच या प्रकरणात कुणाचीही गय करु नका असे आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात भरधाव पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कारचालक वेंदात अग्रवाल याला पकडून जोरदार चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.

या घटनेनवरुन राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. समाजातील विविध क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. यानंतर राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन या संदर्भात चर्चा केली होती. याप्रकरणी पोलिसांनी कुठलाही दबाव न झुगारता कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही याप्रकरणी राजकीय दबाव न झुगारता कारवाई करा, असे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत.

त्यानंतर आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तालयात भेट देऊन, अधिक माहिती घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी अचानक टाकलेल्या धाडीमुळे पुणे पोलिसांची पळापळ झाली. दरम्यान या प्रकरणात आरोपीचे वडील आणि उद्योगपती विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आली असून, आज त्याला पुणे पोलीस आयुक्तालयात हजर करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments