Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजकार व कंटेनरची समोरासमोर धडक; चार गंभीर जखमी

कार व कंटेनरची समोरासमोर धडक; चार गंभीर जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाघोली : बकोरी – थेऊर या अष्टविनायक महामार्गावर जोगेश्वरी मंदीरा समोर कंटेनर व कार मध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेत सात जण जखमी झाले. यातील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला. हा अपघात रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. कार मध्ये सात जण होते. त्यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. गणेश जाधव, विनोद भोजणे, विठ्ठल जोगदंड, हेमंत देसाई अशी रुग्णालयात दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांना वाघोली व खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कार चालक अडकून पडला होता.

पोलीस व नागरिकांनी त्याला काढून रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे कर्मचाऱ्यांसहीत अपघात स्थळी पोहचल्या. नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments