Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकारवाई: फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी चालकाकडून चिरीमिरी घेणारा पोलीस कर्मचारी तडकाफडकी...

कारवाई: फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी चालकाकडून चिरीमिरी घेणारा पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लष्कर परिसरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी चालकाकडून चिरीमिरी घेताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहतूक पोलिसास तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याची लाच घेतानाची क्लिप मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

पोलीस हवालदार विजय मेवालाल कनोजिया असे निलंबीत केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याची नेमणूक लष्कर वाहतूक विभाग होती. तो ३० मार्च रोजी महावीर चौकात कर्तव्यावर होता. तेथे दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी कोहीनूर हॉटेल बाजुने महावीर चौकाकडे आली. दुचाकीवर एक पुरुष व एक महीला होते. त्यांचे दुचाकीचे नंबर फॅन्सी असल्याने त्यांना कनोजीया यांनी दंडात्मक कारवाईची भिती दाखवली. यानंतर त्यांचे दुचाकीवर दंडात्मक कारवाई न करता चिरीमिरी घेऊन सोडून दिले. त्याचा व्हीडीओ कुणीतरी बनवुन ‘मार्च एन्ड एम जी रोड’ असा मेसेज तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला.

कनोजीया याच्यावरील कारवाईच्या आदेशात म्हटले आहे की. वाहनावर कायदेशीर कारवाई न करता सोडुन दिले. या संशयास्पद वर्तनाच्या वायरल सोशल मिडीयाच्या क्लीपमुळे पोलीस दलाची प्रतीमा मलीन झाली आहे. त्या अर्थी तुम्ही तुमचे कर्तव्य करीत असताना बेशिस्त बेजबाचदारपणाचे व पोलीस खात्यास अशोभनिय असे गैरवर्तन करुन अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी केली आहे. तुम्हाला विभागीय चौकशीतील कार्यवाहीच्या अधिन राहून शासकिय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. तुम्ही निलंबन कालावधीमध्ये दररोज राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे शहर येथे हजेरी द्यावी. हा आदेश रोहिदास पवार (पोलीस उप आयुक्त, मुख्यालय (अति. कार्य.) वाहतूक शाखा) यांनी काढला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments