Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकारवाईचा संदेश दिल्याने मनोज जरांगे फिरले माघारीः आयपीएस शैलेश बलकवडे पुण्याहून ...

कारवाईचा संदेश दिल्याने मनोज जरांगे फिरले माघारीः आयपीएस शैलेश बलकवडे पुण्याहून जालन्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मराठा आरक्षणासाठी अांतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र, आरक्षण मिळवून देण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अडथळा ठरत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारवर वेगवेगळे आरोप करून मुंबईच्या दिशेने कूच केली. यामुळे मराठवाड्यात पुन्हा एकदा परिस्थिती बिघडू लागल्याने राज्य सरकारने जालना येथे परिस्थिती सांभाळण्यासाठी पुण्यातून आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांना पुन्हा एकदा जालन्यात फील्डवर पाठवले. मध्यस्थामार्फत जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून सरकारची प्रतिमा मलिन करून आंदोलनात पुढे काही साध्य होऊ शकणार नाही, याची जाणीव करून दिली. कायदा-सुव्यवस्था बिघडली तर पोलिस ठोस कारवाई करतील, असा संदेशदेखील मध्यस्थामार्फत दिल्याने जरांगे पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांसह भांबेरी गावातून अांतरवाली सराटीकडे सोमवारी सकाळीच रवाना झाले.

त्यानंतर दुपारी त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. जरांगे यांच्यासोबत करण्यात आलेल्या चर्चेत सांगण्यात आले की, सतत आंदोलन करण्याची त्यांची भूमिका योग्य नाही. त्याचप्रमाणे मागील सहा महिन्यांमध्ये सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंतचे मोठे काम केले आहे. कुणबी नोंदींचा राज्यभरात शोध घेणे, मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग संघटित करून त्याचे काम तातडीने पूर्णत्वास नेणे, राज्यात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करणे, मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त करणे अशी माहिती जरांगे यांना देण्यात आली.

आंदोलन करून काहीच साध्य होणार नाही

सगेसोयरेसंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढला असून कायदेशीरदृष्ट्या त्यावरील हरकतींचे वर्गीकरण करून कायदेशीर प्रक्रिया राबवल्यावर कायद्याच्या कसोटीवर टिकल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. सरकारवर आरोप करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारची प्रतिमा मलिन करणे यातून आंदोलनात पुढे काहीच साध्य होऊ शकणार नाही, असे जरांगे यांना मध्यस्थामार्फत सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments