Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज कारचा दरवाजा उघडून दीड लाखाची रोकड लंपासः अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

कारचा दरवाजा उघडून दीड लाखाची रोकड लंपासः अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ढोले पाटील रोड वर पार्क केलेल्या कारच्या दरवाजा उघडून चोरट्याने दीड लाखांची रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी एका ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या चालकाने ढोले पाटील रोड वरील रुबी हॉल क्लिनिक समोरील रस्त्यावर कार पार्क केली होती. चोरट्याने कारच्या मागचा बाजूचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उघडून कार मधील सुटकेस मधील दीड लाखांची रोख रक्कम लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कोरेगाव पोलीस करत आहेत.

प्रवासा दरम्यान महिलेच्या पर्स मधील तीन लाखांचा मुद्देमाल चोरीस पीएमपी बस मध्ये प्रवाशांकडील मुद्देमाल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी पुन्हा एकदा पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना वाकडेवाडी परिसरात घडली.

याप्रकरणी धायरी येथे राहणाऱ्या ५७ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला पीएमपी बस ने धायरी ते दांडेकर पूल ते वाकडेवाडी बस स्टॉप खडकी प्रवास करत होत्या. बस मधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने फिर्यादी यांच्या बॅग मधील १५ हजार रोख आणि सोन्याचे मंगळसूत्र असा ३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पांडोळे करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments