इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगाव गणपतीः शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिकवसाहत (MIDC) टप्पा क्रं ३ करडे येथील औद्योगिक वसाहतीत रस्त्याचे काम घेतल्याच्या कारणावरुन दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे वैभव महाडिक, शुभम दिवेकर, अक्षय महाडीक, पंडीत देवकर, रणजित वाळके, अमोल बांदल व इतर दोन अनोळखी इसमांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संकेत संतोष महामुनी (वय २५) बांधकाम व्यावसायिक (रा. सरदवाडी ता. शिरुर, जि. पुणे) याने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास करडे गावच्या हद्दीत आय एफ बी कंपनी चौकात संकेत महामुनी आणि त्याचा मित्र सुरज पाडळे त्यांच्या चारचाकी क्रं एम एच १२ यु डब्ल्यु ०२२४ ने करडे ‘एमआयडीसी’ त आले असता. वैभव महाडिक आणि शुभम दिवेकर यांनी मोटारसायकल आडवी लावत “तु एम आय डी सी चे रस्त्याचे काम का घेतले तुला खुप मस्ती आली आहे. तु या आधी पण मला नडला आहे असे बोलत वैभव महाडिक याने त्याच्याकडील पिस्टलच्या उलट्या बाजुने संकेत महामुनी याच्या डोक्याला आणि ओठाला मारहाण करत जबर दुखापत केली. तसेच सुरज पाडळे याच्याही डोक्याला पिस्टलने मारहाण करत दुखापत केली.
तसेच त्यावेळी इनोव्हा व लाल रंगाची स्विफ्ट यामधुन अक्षय महाडीक, पंडीत देवकर, रणजित वाळके, अमोल बांदल व अनोळखी दोघे आले. त्यांनी संकेत व सुरज यास मारहाण करत शिवीगाळ करत दमदाटी केली. अक्षय महाडीक याने संकेत याच्या उजव्या कानास दगडाने मारहाण करत जबर दुखापत केली. तसेच वैभव महाडीक याने संकेत याच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व गळयातील सोन्याची चैन काढुन घेतली. आणि त्याच्या चारचाकी कारच्या काचा दगडाने फोडल्या.
दगडाने गाडीचे ठिकठिकाणी नुकसान केले तसेच सुरज पाडळे याच्या डोक्यास व हाताला दुखापत केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.