Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजकापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्ता पंधरा दिवसांसाठी बंद

कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्ता पंधरा दिवसांसाठी बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

भोर : कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी वाहतूक रस्ता यात्रेकरूंसाठी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद केला आहे. भोर-मांढरदेवी (ता. भोर) रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाला ये-जा करणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होत असल्याने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्या मागणीनुसार हा रस्ता बंद करण्यात आला असून, पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्री क्षेत्र मांढरदेवी काळूबाई देवीची यात्रा १२ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे. मांढरदेवी यात्रेसाठी राज्यातून काळेश्वरी देवीचे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. यात्रा कालावधीमधील काळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भोर, आंबाडेमार्गे आंबाडखिंड घाटातून काळेश्वरी देवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.

सद्यःस्थितीमध्ये भोर ते मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम सुरु असून, सदर रस्त्याचा बहुतांश भाग हा नादुरुस्त स्वरुपाचा आहे. तसेच घाट रस्त्यामध्ये अद्याप बऱ्याच ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्याचे व नादुरूस्त स्वरुपात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या परिपूर्ण उपाय योजना पूर्ण झालेल्या नाहीत.

रस्त्यावर वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. आंबाडखिंड घाट मांढरदेवी प्रारंभपर्यंत सिंगल रोड आहे. घाट प्रारंभ ते घाटमध्य भागापर्यंत रोडचे काम केलेले नाही. त्यामुळे सदरचा रस्ता हा अरुंद घाटाच्या मध्यभागी नवीन रोडचे काम सुरू आहे. त्याठिकाणी सिंगल रोडची वाहतूक सुरू आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ शकते, तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर रस्ता बंद करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments