Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजकानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी; मढी ग्रामपंचायतीचा ठराव, 'वंचित' आक्रमक

कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी; मढी ग्रामपंचायतीचा ठराव, ‘वंचित’ आक्रमक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथ यात्रेत मुस्लिमव्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे. या ठराव लवकर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, असे मढी ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या ठरावावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने या ठरावाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा ठराव असंविधानिक असून, याबाबत जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्याची तयारी दाखवली आहे.

नेमकं प्रकरण काय?

कानिफनाथ यात्रेला होळीपासून सुरवात होते. तर ही यात्रा गुढीपाडव्यापर्यंत सुरू असते. ही यात्रा म्हणजे दुखवट्याचा काळ असतो. मात्र यात्रेतील मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत. यातून भाविकांच्या भावनां दुखावल्या जातात यातून मढी ग्रामपंचायतीने मुस्लिमांना बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे.

कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे. पारंपारिक पद्धतीने महिनाभरापूर्वी देवाला तेल लावले जाते. या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाही. पलंग, गादी वापरत नाहीत. याच परंपरा यात्रेत सहभागी होणाऱ्या इतर भाविकांना देखील लागू होतात. पण, त्याचे पालन केले जात नसल्याने यावरून मढी ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मढी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड म्हटले की, एक महिन्यावर कानिफनाथांची यात्रा आली आहे. या यात्रेत बहुसंख्य व्यापारी मुस्लिम येत असतात आणि ते परंपरा पाळत नाहीत. या काळात महिनाभर देवाला तेल लावले जाते. हा काळ दुखवट्याचा असतो. या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामं करत नाही. गादी आणि पलंग देखील वापरत नाही. असे मरकड यांनी सांगितले.

कुंभ मेळाव्याच्या धर्तीवर मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी…

यात्रेनिमित्ताने गावात आलेले मुस्लिम व्यापाऱ्यांकडून ही परंपरा पाळली जात नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनांना ठेच पोहचते. कुंभ मेळाव्याच्या धर्तीवर मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव मढी ग्रामपंचायतीकडून मांडण्यात आला आहे. हे लोक स्वतः कुंकू वापरत नाहीत. ते आम्हाला कुंकू विकतात. काही मुस्लिम व्यापारी दोन नंबरचे धंदे करतात. यामध्ये भाविकांची लूट होते. या अगोदर भाविकांना मारहाण देखील झाल्याचे प्रकार घडल्याचे संजय मरकड यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments