Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकात्रज भागात भर रस्त्यात टोळक्याकडून गोळीबार

कात्रज भागात भर रस्त्यात टोळक्याकडून गोळीबार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कात्रज : संतोषनगर परिसरात गाडीवर येऊन टोळक्याने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. संतोषीमाता मंदिराजवळील घुंगरूवाला चाळ येथे रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यात हा प्रकार घडला. या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मित्रांमध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादावरून ही घटना घडली. त्यात एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.

कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर?

या घटनेमुळे कात्रज परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सणासुदीच्या काळात आणि निवडणूक आचारसंहिता सुरू असताना शहरात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अशावेळी तरुणांकडे गोळीबार करण्यासाठी पिस्तूल कोठून येते? याबाबत पोलिस अनभिज्ञ कसे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments