Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedकात्रज भागात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

कात्रज भागात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच आहेत. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता कात्रज भागातील गुजरवाडी फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील पाठिमागे बसलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुण जखमी झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोनी कृष्णा श्रीवास्तव (वय 24, रा. वडाळा, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार करण प्रवीण चिकणे (वय 24, रा. दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) हा जखमी झाला आहे. करण चिकणे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार करण चिकणे आणि त्याची मैत्रीण सोनी श्रीवास्तव हे दोघेजण कात्रज भागातून निघाले होते. त्यावेळी गुजरवाडी फाटा परिसरात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाठिमागे बसलेली सोनी या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकी चालक करण चिकणे जखमी झाला आहे. जखमी झालेल्या करणवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी ट्रकचालक सागर विलास थोरा (वय 29, रा. काशीद बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments