Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजकात्रज घाटामध्ये पुन्हा एकदा वनवा ; दरवर्षी उन्हाळ्यात कात्रज घाटात वनवा लागण्याची...

कात्रज घाटामध्ये पुन्हा एकदा वनवा ; दरवर्षी उन्हाळ्यात कात्रज घाटात वनवा लागण्याची घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कात्रज : कात्रज घाटातील भिलारेवाडी वनक्षेत्रात वनवा लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. वणवा आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

कात्रज जुन्या घाटात खेड-शिवापूर वरून कात्रजच्या दिशेने येताना डाव्या बाजूला जुन्या बोगद्याजवळ पांढरा कडा येथे आग लागली. व्यसनी तळीराम यांच्या मुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वनरक्षक संभाजीगायकवाड, वनसेवक संभाजी धनावडे, दिलीप गोगावले यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

वनव्याच्या घटनांमुळे वनसंपत्ती तसेच वन्यजीवांना मोठे नुकसान होते. मात्र त्याबाबत वन प्रशासन गंभीर नसल्याचे यापूर्वी अनेक घटनांनी समोर आले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात कात्रज घाटात वनवा लागण्याच्या घटना वारंवार घडत असून वन विभागाकडून त्या रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना केले जात नाहीत. तसेच घाटात बसणारी जोडपी व धूम्रपान करणारे तळीराम यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी पर्यावरणप्रेमी कडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments