Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढणार, आयुक्तांची माहिती

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढणार, आयुक्तांची माहिती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २०० कोटींच्या निधीबाबत राज्य सरकारकडून पत्र आले आहे. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यावर वंडर सिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंतचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. पण या रस्त्यावरील भूसंपादनात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राजस सोसायटी चौकापासून पुढे हा उड्डाणपूल १५० मीटरपर्यंत वाढविण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा घेतला. या बैठकीपूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी रस्त्याची पाहणी केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ठेकेदार संदीप पटेल, पथ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कात्रज कोंढवा रस्ता ८४ ऐवजी आता ५० मीटर रुंदी केली जाणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. यापैकी २०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार या निधी बाबत राज्य सरकारकडून पालिकेला पत्र आले आहे. त्यामुळे हा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरील उड्डाणपूल १५० मीटर पर्यंत वाढविल्यास अनेक घराच्या जागांचे भूसंपादन करावे लागणार नाही.

या रस्त्याच्या रुंदीकरण्यासाठी धारीवाल, बधे आणि माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्या जागाचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यांच्याच जागा जास्त आहेत. त्यामुळे या जागा मालकांशी येत्या सोमवारी पुन्हा बैठक आयोजित केली आहे अशी माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

RELATED ARTICLES

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शिरूर तालुक्यातील निर्वी येथे अपघातात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) न्हावरे : निर्वी (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत निर्वी - कोळगाव डोळस रस्त्यावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या...

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

Recent Comments