Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकात्रज उड्डाणपुलाचे काम अपूर्ण; मुदतवाढीची प्रक्रिया सुरू, वाहतूक कोंडीची समस्या कायम

कात्रज उड्डाणपुलाचे काम अपूर्ण; मुदतवाढीची प्रक्रिया सुरू, वाहतूक कोंडीची समस्या कायम

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कात्रज : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ सप्टेंबर २०२१ मध्ये झाले होते. त्यानंतर दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मुदत संपूनही उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्णावस्थेत आहे. या कामासाठी डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, उर्वरित कामासाठी किमान आणखी एक ते दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे.

नवले पुलाकडून कोंढव्याकडे जाणारी वाहतूक कात्रज चौकात न येता ती थेट वंडरसिटी येथून उड्डाणपुलावरून माउली गार्डनजवळ जाणार आहे. त्यात आता राजस चौक परिसरात महापालिकेकडून भूसंपादन न झाल्याने काम रेंगाळले आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधत असलेला हा उड्डाणपूल पुढे कोंढवा रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियापर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने मांडला आहे, परंतु हा प्रस्ताव केवळ कागदावरच असल्याने कात्रज चौकातील उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होण्यास आणखी किती वेळ लागणार ? हा प्रश्न अनुत्तरित आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामाचे खापर मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महापालिकेवर फोडले जात आहे.

अशी आहे उड्डाणपुलाची सद्यःस्थिती

• कार्यारंभ आदेश – २५ फेब्रुवारी २०२२

• कामाची मुदत – २४ फेब्रुवारी २०२४ (२४ महिने पूर्ण)

• वाढीव मुदतीची मागणी – डिसेंबर २०२४ पर्यंत

• कामाला आणखी लागणारा अंदाजे वेळ – किमान एक ते दीड वर्ष

• एकूण पिलर कॅप : २० पैकी १९ पूर्ण

कात्रज चौक म्हणजे दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार आहे. विविध शहरांसाठीचा मार्ग या चौकातून जातो. अनेक शैक्षणिक संस्था या भागात असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते. मात्र, उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. अनेक अपघात या ठिकाणी झालेले असून, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कामाला गती देत हा प्रकल्प पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.

अनेक अडचणींचा सामना करत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. प्राणिसंग्रहालय हद्दीत रात्रीच्या वेळी काम करता येत नसल्याने वेळ लागत आहे, तसेच मुदत संपल्याने वाढीव मुदतीची मागणी करण्यात आली आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments