इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कांदिवली | 23 ऑक्टोबर 2023 : मुंबईत (mumbai news) गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरू आहेच. आता कांदिवलीतही (Kandivli) एका रहिवासी इमारतीला आग (fire in a building) लागल्याचे समोर आले आहे. कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर भागातील पवन धाम वीणा संतूर या इमारतीत लागल्याची माहिती समोर आली आहे.
दुपारी १२.३० च्या सुमारास या नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरू केले. या आगीमध्ये होरपळल्यामुळे ५ रहिवासी जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी दोघांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले,
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाले आगीमुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ केली, अखेर त्यांना यश मिळाले. हे बचावकार्य सुरू असताना इमारतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. मात्र ही आग नेमकी का व कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.