Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे

कांदा अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहायला नको : दादा भुसे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नाशिक :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग केले जाणार आहेत. एकही शेतकरी अनुदानाच्या मदतीपासून वंचित राहायला नको, अशा सूचना पालकंमत्री दादा भुसे यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत. शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. याबाबत माहिती देताना ना. भुसे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४५३ कोटीहून अधिकचे अनुदान वितरीत केले जाणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडचे काम बुधवारी (दि. ३०) उशिरापर्यंत सुरू होते. हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनी करण्यात आले आहे.

कांदा उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहत असेल किंवा काही टेक्निकल अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन भुसे यांनी केले आहे. शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नको याबाबत सबंधित यंत्रणेलादेखील त्यांनी सूचना केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा अनुदानापासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असून दुसरा हप्तादेखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा होईल. योग्य खाते क्रमांक नसल्यास संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क करून योग्य खाते क्रमांक घेण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या आहेत. राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्चला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने २७ मार्चला घेतला. क्विंटलला ३५० रुपयेप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले. सरकारने घोषणा केल्यानुसार ३ ते ३० एप्रिलला शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षक यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू होणार आहे.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments