Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजकसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांचा मोठा निर्णय; म्हणाले...

कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांचा मोठा निर्णय; म्हणाले…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी मोठी घोषणा केली आहे. कचरा मुक्त कसबा नंतर आता फ्लेक्स मुक्त कसबा विधानसभा मतदार संघ करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. मतदार संघातील सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर पोस्टर, फ्लेक्स लावणार नसल्याचे आमदार आमदार रासने यांनी सोमवारी (दि. २४) पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.

आमदार रासने यांनी मतदार संघात विविध उपक्रम राबवुन विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कचरा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियान राबवले होते. या अंतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या इंदूर शहराचा अभ्यास दौरा स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी केला. यावेळी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुनियोजित, गतिशील प्रशासकीय उपाययोजना, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग तसेच फ्लेक्समुक्त शहर ही इंदोरच्या यशाची चतुःसूत्री असल्याचे रासने यांनी म्हटले. कसबा मतदारसंघाच्या स्वच्छतेचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक, बॅनर लावणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी आमदार रासने म्हणाले, मतदार संघातील कोणती विकास कामे पुढच्या पाच वर्षात करायची आहेत? कोणत्या बाबींना प्राधान्य द्यायचे आहे? याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्ग निर्मिती, शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करणे, सारसबाग पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास करणे, महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास ही कामे येणाऱ्या काळात केली जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments