इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा नजीक आला असतानाही नाशिकच्या पालकमंत्री पदाचे घोंगडे अजून भिजत पडले आहे. अर्थात असे असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, ‘कशाला हवा आहे पालकमंत्री? मी आहे ना!’ अशा एकाच शब्दात हा विषय मिटविण्याचा प्रयास करीत इच्छुक मंत्र्यांनाही काहीसा धक्का दिला आहे.
नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रीपदी अनुक्रमे गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. मात्र, या नियुक्त्यांबाबत महायुतीत बिघाडी झाल्याने मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांतच दोन्ही ठिकाणची पालकमंत्रीपदे रद्द केली. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून नाशिक व रायगड या दोन्ही जिल्ह्यांचा कारभार हा पालकमंत्र्यांविनाच सुरू आहे.