Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज कर्वेनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

कर्वेनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कर्वेनगर भागातील ओळखीच्या असलेल्या तरुणाच्या घरी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तोंड दाबून जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर मागील चार महिने तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी साहील भरत सावंत (रा. लेन नं. १०, घर नं. ४६, रायगड कॉलनी, कर्वेनगर) याच्यावर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी पीडित मुलीने आरोपी साहील विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदर मुलगी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. कामानिमित्त मुलगी आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यासोबत घरातच जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यानंतर याबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देखील आरोपीने दिली. त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव या करत आहेत.

रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंग..

कामानिमित्त पुण्यातील खराडी परिसरात राहणारी २३ वर्षीय तरुणी वाघोली परिसरातील रिलायन्स डिजिटल शॉप समोरून एका अनोळखी रिक्षा चालकासोबत रिक्षाने जात होती. त्यावेळी रिक्षाचालकाने तरुणीची मान पकडून त्याच्याकडे खेचून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने आरडाओरड केला व रिक्षाचालकास जोरात ढकलून दिले. त्यानंतर तरुणीने रिक्षातून खाली उतरून मदतीसाठी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणी थांबले नाही, त्यानंतर रिक्षाचालक आरोपीने पुन्हा तिचा हात धरून तिला रिक्षात ओढून नेले व तिचा विनयभंग केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अनोळखी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments