Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकर्नाटकातील कुख्यात चडचंण टोळीसह म्होरक्याला अटकः तीन पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त, पर्वती...

कर्नाटकातील कुख्यात चडचंण टोळीसह म्होरक्याला अटकः तीन पिस्तुलासह 25 काडतुसे जप्त, पर्वती पोलिसांची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कर्नाटकातील कुख्यात चडचंण टोळीचा म्होरक्याला अटक करण्यात पर्वती पोलिसांना यश आले आहे. टोळीकडून तीन पिस्तूल आणि २५ जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मंड्डु उर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठ (वय 35, रा. विजापुर कर्नाटक, सध्या रा. पिसोळी उंड्री) सोमलींग गुरप्पा दर्गा (वय 28, रा. कनार्टक) प्रशांत गुरुसिध्दप्पा गोगी (वय 37, रा. शिवशंभो नगर, कात्रज कोंढवा रोड मुळ ता. सुरपुर जि. यादगीर, राज्य कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पर्वतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना कर्नाटकमधील कुख्यात धर्मराज चडचंण टोळीचा म्होरक्या मंड्डु हिरेमठ हा साथीदारांसह पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चार पथकाने लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरात सापळा रचून टोळीच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, उपायुक्त संभाजी कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक सचिन पवार, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रविण जगताप, कुलदिप शिंदे, महेश जेधे, दत्तात्रय नलावडे, सुभाष मोरे, नानासाो खाडे, राकेश सुर्वे, बनसोड यांनी केली.

चौकट-म्होरक्या दोन महिन्यांपासून राहत होता पुण्यात

उत्तर कर्नाटमधील कुख्यात धर्मराज चडचंण व महादेव बहिरगोंड (सावकार) टोळयामध्ये वाद आहे. पोलीस चकमकीत धर्मराजचा मृत्यु झाला आहे. त्याचा भाउ गंगाधर चडचंणचा खुन महादेव सावकार याच्या टोळीने केल्याच्या संशयातुन मंडु ऊर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठने धर्मराजची टोळी सक्रिय ठेवली होती. त्याचा मोरक्या होवुन महादेव सावकारवर ४० साथीदारांनी ६ गावठी पिस्तुलासह २०२० मध्ये हल्ला केला होता. हल्यामध्ये सावकार टोळीच्या दोन साथीदारांचा खुन झाला होता. त्यावेळी महादेव बचावला होता. तेव्हा पासुन मंड्डु हिरेमठ टोळी चालवत होता. दोन महिन्यापासुन तो परिवारासह उंड्रीत राहत होता. पर्वती पोलीसांनी निवडणुक प्रक्रियेच्या पार्श्वभुमीवर कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन अचुक माहितीच्या आधारे टोळीला अटक केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments