Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजकर्नाटकच्या कुख्यात टोळीचा म्होरक्या अटकेतः 3 पिस्तूल अन् 25 जिंवत काडतुसे...

कर्नाटकच्या कुख्यात टोळीचा म्होरक्या अटकेतः 3 पिस्तूल अन् 25 जिंवत काडतुसे जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

कर्नाटकातील कुख्यात चडचंण टोळीचा म्होरक्या मंड्ड ऊर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठला (वय ३५ रा. विजापूर कर्नाटक, सध्या रा. पिसोळी उंड्री) त्याचे साथीदार सोमलिंग गुरप्पा दर्गा (वय २८, रा. कनार्टक) प्रशांत गुरुसिध्दप्पा गोगी (वय ३७, रा. शिवशंभोनगर, कात्रज कोंढवा रोड, मूळ ता. सुरपूर, जि. यादगीर, कर्नाटक) यांना पर्वती पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि २५ जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पर्वतीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना हिरेमठ साथीदारांसह पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चार पथकांनी लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरात सापळा रचून टोळीच्या मुसक्या आवळल्या. चडचंण व महादेव बहिरगोंड (सावकार) टोळ्यामध्ये वाद आहे. त्यात गंगाधर चडचंणचा खून महादेव सावकार याच्या टोळीने केल्याच्या संशयातून मंडू ऊर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठने महादेववर हल्ला केला. त्यात महादेव बचावला. मात्र, त्याचे दोन साथीदार मारले गेले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments