Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजकर्ज देण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कर्ज देण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय रमेश जाधव (रा. औदुंबर दर्शन सोसायटी, फातिमानगर, वानवडी) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत एका व्यक्तीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांची एका परिचितामार्फत आरोपी तन्मय जाधव याच्याशी ओळख झाली होती. तक्रारदार यांना व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज पाहिजे होते. त्यानुसार आरोपी जाधवने व्यंकटेश्वरा एंटरप्रायजेस या खासगी वित्तीय संस्थेकडून १५ दिवसांत चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असं आमिष दाखवले.

त्यानंतर तक्रारदारांना त्याने रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेत तेथे त्यांच्याबरोबर मुद्रांकावर करारनामा केला. कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ६ लाख ८७ हजार रुपये जाधव याने घेतले. मात्र, त्यांना कर्ज दिले नाही. याबाबत व्यावसायिकाने विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांच्या फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जे. आर. फडतरे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments